कणकवलीत पटकीदेवी मंदिराजवळ महाआरतीला शेकडोंची उपस्थिती

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते देवीची महाआरती

कणकवली शहरातील महिलांची मोठी उपस्थिती

कणकवली पटकीदेवी मंदिराजवळ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज दसऱ्याच्या आदल्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात येते. पटकी देवी मित्र मंडळाच्या वतीने या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरपंचायत च्या नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज सोमवारी सायंकाळी महाआरती करण्यात आली. गेली काही वर्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून पटकी देवी मंदिरा जवळ महाआरतीची आयोजन करण्यात येते. या निमित्ताने दसऱ्याच्या आदल्या दिवशी या ठिकाणी सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी असते. आज देखील या महा आरती साठी मोठ्या प्रमाणावर महिला भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!