रामेश्वर वाचनालयाचे चोखंदळ वाचक पुरस्कार वेदांगी पुजारे,चिन्मयी पेंडूरकर यांना जाहीर
1 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार वितरण
श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित आणि ऍड. सायली आचरेकर पुरस्कृत कै. मारुती प्रभाकर आचरेकर यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा “चोखंदळ बाल वाचक पुरस्कार 2024 “संस्थेचे नियमित बालवाचक कु. वेदांगी नरेश पुजारे व कु. चिन्मयी सुहास पेंडूरकर यांना विभागून जाहीर झालेला आहे, सदरचा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना संस्थेच्या गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी रामेश्वर भक्त निवास येथे होणाऱ्या वार्षिक सर्व साधारण सभेत वितरित करण्यात येणार आहे.यावेळी दहावी बारावी प्रथम द्वितीय गुणवंत विद्यार्थ्यांना सौ उर्मिला सांबारी,जयप्रकाश परुळेकर, सौ उज्वला सरजोशी यांनी पुरस्कृत तसेच अभिजीत जोशी पुरस्कृत शिष्यवृत्ती, सिंधूटलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीसे देवून गौरविण्यात येणार आहे. संस्कृत ,गणित, शास्त्र विषयात प्रथम विद्यार्थ्यांना श्रीमती लक्ष्मी कानविंदे यांच्या कडून रोख रक्कमेची बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व वाचन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.
आचरा, अर्जुन बापर्डेकर