दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कणकवली तालुका वकील संघटना सरसावली

जाणवली रातांबी व्हाळ या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा घालत दिला सामाजिक संदेश
कणकवली तालुका बारा असोसिएशन चा स्तुत्य उपक्रम
कणकवली तालुका बार असोसिएशन, च्या माध्यमातून वनराई बंधारा घालत दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करून पाणी आडवा पाणी जिरवाचा संदेश देण्यात आला. सध्या निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती व पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी, पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, तसेच भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आलेले आहे. या आवाहनाला अनुसरून कणकवली तालुक्यात जाणवली रतांबी वहाळा या ठिकाणी वनराई बंधारा घालत वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. या उपक्रमामध्ये अध्यक्ष कणकवली तालुका बार असोसिएशन कणकवली, ॲड. राजेश परुळेकर, सर्व ॲड. मिलिंद सावंत सचिव, तुषार परब, खजिनदार, विलास परब, ॲड. उमेश सावंत, एस. बी दळवी, अनिल बर्वे, सौ रेखा सावंत, महिला उपाध्यक्ष, श्वेता रजपूत, प्रकाश पावसकर, प्रसन्न सावंत, शंकर राणे, कौस्तुभ मर्गज, संदीप राणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता सिंधुदुर्ग, राधिका मुंज, प्रतिमा सातोसे, ओंकार परुळेकर, अथर्व बर्वे, मकरंद नातू, अग्निवेश तावडे, अक्षय कुलकर्णी, विष्णू सावंत, भरत गावकर, यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला वकील संघटनेच्या या उपक्रमाबद्दल जनतेमधून देखील कौतुक केले गेले.
कणकवली प्रतिनिधी






