कृषी दुतांनी दिले बीजप्रक्रियेचे धडे

डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न सांगुळवाडी कृषीमहाविद्यालय मधील मुलांनी गोवळ येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.बीजप्रक्रिया केल्यामुळे बीयांमधील उगवण क्षमता, रोगप्रतिकारक शक्तीवाढत असल्याची माहिती कृषी दुतांनी प्रात्यक्षिकासह उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

यावेळी प्रतिक साटम, ओंकार शिंदे,दुर्गेश घाडी,अथर्व आंबेरकर ओंकार रहाटे,विघ्नेश गुरव,अनिकेत सोनावणे, आदी कृषी दूत उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी दुतांना प्राचार्य स्वप्नील होळकर,कार्यक्रम अधिकारी विवेक कदम,विषयतज्ञ सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!