शासकीय कामात अडथळा आणत कणकवली मुख्याधिकारी व कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी शैलेश नेरकर व समीर आचरेकर यांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींतर्फे ऍड. विद्याधर चिंदरकर व अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

शासकीय कामात अडथळा आणत कणकवली नगर पंचायत मुख्याअधिकारी व कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कणकवली येथील शैलेश नेरकर व समीर आचरेकर यांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. हे. भ. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अडव्होकेट विद्याधर चिंदरकर व अक्षय चिंदरकर यांनी पहिले काम
दिनांक ७/१२/१५ रोजी कणकवली नगरपंचयातचे कर्मचारी विश्वनाथ शिंदे यांचे केबिनमधे जात आरोपी शैलेश नेरकर याने हालचाल रॅजिस्टर मागितले तेव्हा शिंदे यांनी हालचाल रजिस्टर मुख्याधिकाऱ्यांना भेटून घ्या असे सांगितले व रजिस्टर देणेस नकार दिला. त्यावेळी आरोपी यांनी शिंदे याना मुख्याअधिकारी कुठे आहेत असे विचारले असता त्या ते जेवायला घरी गेलेत असे सांगितले. मुख्याधिकारी कार्यालयीन वेळेत जेवायला गेले कसे असा आरोपीनी जाब विचारत रॅजिस्टर न दिल्यास बघून घेऊ असे कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यानंतर आरोपी शैलेश नेरकर यांनी राजन दाभोळकर याना नगरपंचायतमध्ये बोलावून घेतले व कर्मचारी शिंदे यांचेकडून हालचाल रॅजिस्टर खेचून घेत हुज्जत घातली. तसेच थोड्यावेळाने मुख्याअधिकारी नगरपंचायत मध्ये आल्यानंतर आरोपी शैलेश नेरकर, राजन दाभोळकर व समीर आचरेकर यांनी मुख्याधिकारी यांच्या अंगावर धावत जात दमदाटी केली व इतर कर्मचाऱ्याना देखील धमकावले.
याबाबत फिर्यादी शिंदे यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध भा. द. वी. कलम ३५३, ३५२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत ५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीतील तफावत व आरोपी याने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला याबाबत ठोस पुरावा न आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!