कुडाळदेशकर गौड ब्राह्मण गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव

विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने तालुक्यातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वा. पूर्णानंद भवन, फोंडाघाट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेंडोलकर (प्राचार्य-आठले – सप्रे महाविद्यालय, देवरुख- संगमेश्वर), श्री. गणेश देसाई (शिक्षणतज्ञ – मार्गदर्शक, डोंबिवली) ऍड.सुर्यकांत प्रभूखानोलकर (सुप्रसिध्द विधीज्ञ, वेंगुर्ले) उपस्थित राहणार आहेत.
तरी समाज बांधवांनी सहकुटुंबीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, उपाध्यक्ष विद्याधर केळुसकर, कार्यवाह ऍड. एन. आर. देसाई सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.
कणकवली, प्रतिनिधी