साईबाबा सोशल क्लब मार्फत गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कणकवली शहरातील गांगोवाडी परिसरात सुमारे वीस हुन अधिक गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी वह्या वाटप करण्यात आले. साईबाबा सोशल क्लब चे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांच्या सूचनेनुसार हे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर,, संतोष पटेल, सुजित बाईत, सुधीर साटम, सचिन कासले व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!