आगीत राहते घर खाक ; लाखोंचे नुकसान!

मालवण तालुक्यातील मसूरे बागायत जवळ असलेल्या भोगलेवाडी येथे गुरुवारी सकाळी घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .
हे मसुरे भोगलेवाडी येथील सुनील सोमा भोगले यांचे राहते घर आहे . काल सुनील भोगले आपल्या पत्नी व मुलांबरोबर मुंबईला गेले असल्याने घरी कोणीही नव्हते, त्या दरम्यान अचानक त्यांच्या घराला आग लागल्याने जवळपासच्या नागरिकांनी त्वरीत मालवण नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशामक बंबाची व्यवस्था केली व आग आटोक्यात आणली.
या आगीमुळे एक कार, दोन रिक्षा, तीन स्कूटर जळून त्यांचे नुकसान झाले. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संकेत साठे, चालक खडपकर यांचेही सहकार्य लाभले, याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.






