“सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे जि. प. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्याना शैक्षणिक संच वाटप……

गव्हाणे ग्रामविकास मंडळ (मुंबई) यांनी केलेला पाठपुरावा व त्यांच्या प्रयत्नांना सेवा सहयोग फाउन्डेशन करून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद तसेच मैत्री ग्रूप (रसिका गवाणकर, दिपक पाष्टे, किशोर शेलार, विलास पतयाण, प्रकाश भागावडे, राजेंद्र जाधव,वैशाली शेलार, प्रतिभा पवार, सरिता शेलार) यांच्या प्रयत्नांमुळे जि‌. प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे (खैराट) व जि प प्राथमिक शाळा कुरंगवणे (प) मधील विद्यार्थ्यांना “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे)” यांच्यामार्फत “शैक्षणिक संच” वाटप कार्यक्रम रविवार दिनांक १६ जून २०२४ रोजी दुपारी ११.०० वाजता जि‌. प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे (खैराट) या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे बहुमूल्य असं शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यात आलं. सदर शैक्षणिक संच वाटप कार्यक्रम जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट चे मुख्याध्यापक श्री. बागडी सर, सहकारी शिक्षक वावदाने सर आणि कासार सर व खोत सर आणि कुरंगवणें (प) चे सचिन सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत चे सरपंच मा. संतोष ब्रम्हदंडे, उपसरंच मा. बबलू पवार, तसेच दोन्ही शाळांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष (बाबू गोठणकर/ प्रमोद गाडे) शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, समस्त पालक तथा सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता, या कार्यक्रमाचे नियोजन सुनिल गोठणकर, प्रविण कुडाळकर, अमोल कुडाळकर, अजय पुरी, यांच्या पुढाकाराने करण्यात आलं, त्याचबरोबरच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिराम गोठणकर, पांडुरंग गोठणकर, तानाजी कुडाळकर, विष्णू कदम, अनंत भितम, दिपक कदम, प्रमोद कदम, अशोक भितम, राजेश भितम, शुभम भितम, संदीप कुडाळकर यांनी मोलाचं सहकार्य केलं, कार्यक्रमाच्या सुरुवातीला खैराट शाळेचे मुख्याध्यापक श्री बागडी सर व कुरंगवणे (प) शाळेचे सचिन सर यांनी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे पुरवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असताना “सेवा सहयोग फाउंडेशन” या संस्थेकडून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी कायम भरीव मदत करत असलेल्या त्यांच्या कार्याचं कौतुक केलं, तसेच सहकारी शिक्षक श्री वावदाने सर यांनी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे)” तर्फे वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा करून “सेवा सहयोग फाउंडेशन (ठाणे)” च्या सर्व संचालकांचे मन:पुर्वक आभार मानले व त्यांना पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्या, आणि श्री सचिन सर यांनी विद्यार्थ्यांना या “सेवा सहयोग फाउंडेशन (ठाणे)” तर्फे वितरीत करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचं महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. सदर “सेवा सहयोग फाउंडेशन” च्या वतीने जि. प. शाळा गुंजवणे (पतयाण वाडी) या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक संचांचं वाटप याच दिवशी करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी श्री खोत सर यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली……!

error: Content is protected !!