दीपावलीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी’ उपक्रम यशस्वी; खारेपाटण किल्यावर उजळला दीपोत्सव”

मंगळवार दि.१० नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पाडव्या दिवशी सायं.६.३० वाजता किल्ले खारेपाटण येथे किल्ले संवर्धन समिती व मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव अर्थात “दीपावलीचा एक दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी” हा उपक्रम राबविण्यात आला.दरवर्षी प्रमाणे यावर्षीचाही दीपोत्सव – २०२६ हा उपक्रम मोठ्या उत्साहात व नियोजनबद्द यशस्वीपणे सुंदररित्या पार पाडण्यात आला.या कार्यक्रमाला खारेपाटण मधील महिला व पुरुष वर्ग तसेच युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
यावेळी “मावळे आम्ही स्वराज्याचे’ चे संघटनेचे कणकवली संघातील सदस्य आणि पदाधिकारी यांनी थोड्या उशिराने का होईना मात्र किल्ले खारेपाटणला भेट दिली.याबद्दल खारेपाटण ग्रामस्थानी.त्यांचे आभार मानले.
तर या दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण खारेपाटण किल्ला परिसराची साफसफाई व स्वच्छता करून
संपूर्ण किल्ला परिसरात दिवे लावून उजळवून टाकण्यात आला.हा कार्यक्रम.यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील पुरुष -.महिला,युवक – युवती आणि नागरिकन यांनी मेहनत घेतली. तसेच किल्ले खारेपाटण संवर्धन समिती,मावळे आम्ही स्वराज्याचे, कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत खारेपाटण यांचे देखील विशेष योगदान लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मेहनत घेतलेल्या व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्वांचे किल्ले खारेपाटण संवर्धन समिती तर्फे मनःपूर्वक आभार माणण्यात आले.






