दिवाळीच्या निमित्ताने “स्वरगंध” सारखे कार्यक्रम नागरिकांचा आनंद द्विगुणीत करतात

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन
कणकवली टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळ आयोजित स्वरगंध कार्यक्रमाला समीर नलावडे, अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा
नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त स्वरगंध या संगीतमय कार्यक्रमाने दिवाळी चा आनंद द्विगुणित केला. अशा कार्यक्रमांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने आपली संस्कृती जपण्याचे काम हे मित्र मंडळ करत आहे. कणकवली शहराला सांस्कृतिक वारसा आहे. व तो वारसा जपण्याचे काम अशा कार्यक्रमांमधून होत असते. स्वरगंध या कार्यक्रमा ला उपस्थित राहिल्या नंतर एक आत्मिक समाधान मिळते. व यानिमित्ताने आयोजकांनी येथील नागरिकांना देखील एक चांगली उत्कृष्ट गायकांची गाणी ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली ही बाब कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. नागेश्वर मित्र मंडळ आयोजित स्वरगंध या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत श्री नलावडे यांनी आयोजकांना व या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी नगरसेविका मेघा सावंत, आर्या राणे, महेश सावंत, औदुंबर राणे, बापू खरात यांच्यासह नागेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आदर्श संगीत विद्यालयाचे संदीप पेंडुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी उत्कृष्ट गायन सादर करत सुरांची मैफिल रंगवली. या कार्यक्रमाला टेंबवाडीतील नागरिकांची मोठी गर्दी होती.






