कणकवलीतील राजेश परब यांचे निधन

कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी राजेश शांताराम परब वय (36) यांचे काल बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. अस्वस्थ वाटू लागल्याने ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेले असता तेथे त्यांचे निधन झाले. कणकवलीतील सुहास पान स्टॉलवर गेले अनेक वर्ष ते कामाला होते. तसेच कणकवली शहरातील काही भागांमध्ये वृत्तपत्र घरपोच देण्याची सेवा ही त्यांनी केली होती. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे.

error: Content is protected !!