फोंडाघाट मधील न्यू ऐजिवडे येथील पाण्याचा प्रश्न पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून लागला मार्गी

ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे, जि. प. सदस्य मनोज रावराणे व पं. स. सदस्यांचे मानले आभार

गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमधून समाधान

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट न्यू ऐजिवडे येथील पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न तातडीने मार्गी लावत या ठिकाणी पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. तात्काळ हे काम मार्गी लावण्याकरिता कार्यवाही केल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासहित जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व पंचायत समिती सदस्य पवन भालेकर यांचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यामातून तसेच पंचायत समिती सदस्य पवन भालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद 15 वित्त आयोगाच्या निधीतून फोंडाघाट न्यू ऐजिवडे येथे पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ मानसी मराठे, शक्ती केंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड, महिला मोर्चा आघाडी दर्शना पेडणेकर, सचिन राणे हेमंत फोंडेकर, तसेच रघुनाथ कसबले, विश्वनाथ कासबले,. सहदेव कसबले, लक्ष्मण बिरबोळे, सुरेश पालकर, वसंत चव्हाण आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केले व आभार मानले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!