स्पाईन फाउंडेशनचे मणका आजार तपासणी शिबिर संपन्न

जिल्हाभरातील रुग्णांनी घेतला लाभ

दि स्पाईन फाऊंडेशन,मुंबई आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मणक्याच्या आजाराने त्रस्त रुग्णांचे मोफत तपासणी शिबीर शनिवारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आयोजित करण्यात आले.
    आंतरराष्ट्रीय स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या विद्यमाने आतापर्यंत सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्यातील मणक्याच्या आजाराने त्रस्त रुग्णांची तपासणी यापूर्वी सहा वेळा झाली असून हे सातवे तपासणी शिबिर आहे. प्रत्येक वेळी तपासणी शिबिरामध्ये शस्त्रक्रिया सुचविलेल्या रुग्णांच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया येथे मोफत करण्यात आल्या. साधारणतः मणक्याच्या एका शस्त्रक्रियेला पाच ते सहा लाख खर्च येत असून स्पाईन फाऊंडेशनच्या वतीने या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत ६० शस्त्रक्रिया यशस्वीपणे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आल्या. डॉ. शेखर भोजराज व त्यांची टीम जवळपास ५० डॉक्टरांची असून संपूर्ण भारतभर जाऊन शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करतात. 
शनिवारी संपन्न झालेल्या शिबिरासाठी स्पाईन फाउंडेशन, मुंबईचे डॉ निशांत सीतुत ,डॉ विस्मय हरकारे,डॉ नील वोहरा डॉ.प्रणित पावसकर हे अस्थिव्यंग विशेषज्ञ तसेच सहाय्यक श्री रोशन कुळे  उपस्थित होते.
या शिबिराला सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, उपजिल्हा रुग्णालय, कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ धनंजय रासम ,डॉ धनेश म्हसकर,डॉ सर्वेश तायशेटे यांनी देखील सहकार्य केले. शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी डॉ सुहास पावसकर , हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , पत्रकार
विजय गांवकर, पत्रकार सीताराम गावडे ,हनुमंत घाडीगांवकर तसेच उपजिल्हा रुग्णालय, कणकवलीतील कर्मचारी उपस्थित होते.
या तपासणी शिबिरामध्ये 154 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.गरजेनुसार रुग्णांचे एक्स-रे सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मोफत काढण्यात आले .तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया सुचवल्या आहेत त्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया लवकरच उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे करण्यात येणार आहेत .
error: Content is protected !!