सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड


 भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

सावंतवाडी : भाजपा दिंव्यांग आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक कसाल येथिल सिद्धीविनायक हाॅल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस तथा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सर्वप्रथम दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले , त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली .
यावेळी दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला , त्याप्रमाणे काम करत असताना येणाऱ्या अडचणी जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या . तसेच आगामी काळात शासनाच्या वेगवेगळया योजना दिंव्यांगांना मिळाव्यात अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिंव्यांग आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करून , आपल्या कार्याची दखल पक्ष नक्कीच घेईल असे अभिवचन दिले. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन मधुन जास्तित जास्त निधी देणार असल्याचे सांगितले. तसेच दिव्यांगांंचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत सोडविण्यात येतिल अशी ग्वाही दिली.
यावेळी पक्ष बांधणीच्या दृष्टीने विविध पदाधीकारी यांची निवड करण्यात आली व त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली . यामध्ये मनोज सातोसे यांची ५٪ शासकीय निधी प्रभारी म्हणून, स्वाती राऊळ यांची क्रिडा प्रभारी म्हणून, भरत परब  यांची वैद्यकीय प्रभारी म्हणून, सुधीर चव्हाण यांची कुडाळ तालुका प्रभारी म्हणून, सत्यवान पावले यांची क्रिडा सह.प्रभारी म्हणून, प्रशांत केळुसकर यांची वेंगुर्ले तालुका प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.
 यावेळी दिंव्यांग आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट, कोशाध्यक्ष दिक्षा तेली, प्रकाश वाघ, विजय कदम, प्रकाश सावंत, सिताराम पंडित, मनिषा भगत, नम्रता राणे, शलाका पालव, जयश्री मेजारी, आदिती राणे, गजानन हरमलकर, संतोष झोरे, सदानंद मोरये इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते .

रामचंद्र कुडाळकर / सावंतवाडी / कोकण नाऊ

error: Content is protected !!