हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती
श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा
प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत मृण्मयी केरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला
श्री माता कालिकादेवीच्या मंदिरात गेले दोन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री माता कालिकादेवी सेवा मंडळ आयोजित ही स्पर्धा श्री माता कालिकादेवीच्या रंगमंचावर पार पडली. जिल्हास्तरीय स्पर्धेत द्रितिय नेहा जाधव, तृतीय दुर्वा पावसकर, उतेजनार्थ पूर्वा मेस्त्री, नंदिनी बिले, संजना पवार, समर्थ गवंडी तर गावपातळी द्वीतीय मनय मसुरकर यांनी मिळविला स्पर्धेचे परीक्षण परीक्षक शेखर गवस आणि सत्यवान गावकर यांनी केले.
यावेळी रमेश हुले सिद्धेश हुले, अभिनव हुले, अजय हुले, विजय हुले, पंढरीनाथ केरकर, प्रकाश हुले, कालिका माता सेवा मंडळाचे मुंबई आणि गावमंडलाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत हुले अजय हुले यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके मेडल देऊन गौरविण्यात आले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.