को.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

को.रे.मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक

निलेश जोशी। सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवसर आणि राजापूर रोड या स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या दि. १० मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून ११ वाजून ४० मिनिटांपर्यंतच्या कालावधीत हा मेगाब्लॉक असेल. त्याचा परिणाम तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडीवरून सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी सुटते. ती उद्या सकाळी नऊ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या गाड्या २० ते ३० मिनिटं थांबवल्या जाणार आहेत, असे कोकण रेल्वे व्यवस्थापनाने कळविले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!