संदेश पारकर यांच्या सासूचे निधन

कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी सुहासिनी भालचंद्र कोदे (८६) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या वागदे येथील रत्नागर हॉटेलचे मालक अनंत उर्फ बाळू कोदे यांच्या मातोश्री तर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, नांदगाव येथील चिरेखाण व्यावसायीक महादेव पारकर यांच्या सासू तर माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर यांच्या त्या आई होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!