महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची माहिती
बांदा येथे घेतली बैठक
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्याचा दौरा केला त्यावेळी सावंतवाडी बांदा येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली त्यावेळी भाजप चे बांदा माजी सरपंच जावेद खतीब, राष्ट्रवादी प्रदेश सचिव सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर ,जिल्हा सचिव गुरुदत्त कामत,प्रांतिक सदस्य विलास गावकर्
जिल्हा प्रतिनिधी निशिकांत कडुलकर
जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, सत्य प्रकाश गावडे आदी उपस्थित होते त्यावेळी ना. नारायण राणे साहेबांना
प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
कणकवली प्रतिनिधी