आमदार नितेश राणे टक्केवारीसाठी काम करतात!
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा गंभीर आरोप
नारायण राणेंवर देखील सतीश सावंत यांची टीका
कणकवली : गेली काही वर्ष राणेंबरोबर असताना आम्ही सुद्धा विकास झाला असं सांगत होतो पण नरडवे धरण पंचवीस वर्षे झालं नाही असे सांगत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली. कणकवली येथे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात सतीश सावंत बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावरही सडकून टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते विकास कसा हवा, व्ही आर नंबर म्हणजे काय? इतर जिल्हा मार्ग म्हणजे काय? किंवा विकास कसा करावा हे आमदार नितेश राणेना माहिती नाही. कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं की टक्केवारीसाठी नितेश राणे काम करतात असा खळबळजनक व गंभीर आरोप सतीश सावंत यांनी केला. वैभववाडीतील पदाधिकाऱ्यांना मिळणार स्टॉलच्या भाड्यातील हिस्सा आपल्याला मिळत नाही म्हणून स्टॉल हटाव मोहीम राबवल्याचा आरोप श्री. सावंत यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री ओम गणेश वर येणार नाहीत कारण त्यांना मातोश्री ची ताकद माहिती आहे. असा खोचक टोला देखील सतीश सावंत यांनी राणेंना लगावला.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली