खांबाळे येथे संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

मंगेश लोके मित्रमंडळाचे आयोजन

शिवसेना तालुकाप्रमूख मंगेश लोके, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी:- सध्या धावपळीच्या जीवनात बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष होवून विविध आजारांना आपण कसे निमंत्रण देत आहोत. त्यामुळे आपण नीट काळजी घेतली पाहिजे. पिस्टमय पदार्थयुक्त आहार सेवन केल्यावर चरबीचे प्रमाण वाढत आहे. शरीराला पोषक असणारेच आहार आपण घेतले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. मनोज पाटील यांनी केले. मंगेश लोके मित्रमंडळ खांबाळे आयोजित आरोग्यविषयक शिबीर प्रसंगी बोलत होते.
एम.पी. डेलिनीड मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कराड संचलित संचलित डी.एन.एम.आयुर्वेदिक केअर सेंटर, कोल्हापूर चे डॉ. मनोज पाटील यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरात एकूण 65 शिबिरार्थीनी सहभाग नोंदवत समाधान व्यक्त करत मंगेश लोके मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, उपसरपंच गणेश पवार यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी चेअरमन सुनिल पवार, गुरुनाथ गुरव,अभिकांत रावराणे, दिनेश पालकर,रामदास पवार, नारायण पाटील, माजी उपसरपंच सत्यवान पवार आदी उपस्थित होते.
मंगेश सूद, ग्रामपंचायत शिपाई नंदू पवार, पाणी कर्मचारी अंबाजी पवार यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
प्रस्तावना व आभार सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांनी मानले.

error: Content is protected !!