तेंडोली येथे श्री रवळनाथ पंचायतन वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

दि. २१ ते २५ एप्रिल दरम्यान रंगणार वर्धापन दिन सोहळा
प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २१ रोजी दुपारी 3.30 वाजता ग्रामदेवतेस श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालणे , पाषाणे सजविणे, तरंगाना वस्त्रालंकार, सायंकाळी 6 वाजता सुधाकर दळवी प्रस्तृत चेंदवणकर दशावतार मंडळ (कवठी) चे नाटक, रात्री 9.30 वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ (झाराप) चे नाटक, दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता यजमान प्रायश्चित, श्री देव रवळनाथ चरणी ऋवेद संहिता, दशग्रंथ, पारायणाभिषेक पूजा, पंचायतन यागानुष्ठान, 7.15 वाजता गणेशपुजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण स्थलशुद्धी यज्ञमंडपी देवता स्थापन, पुजन, गणपती अथर्वशीर्ष , गणेश मंदिर व सातेरी मंदिरात जप, दुपारी 1.30 वाजता नवैद्य, प्रसाद, सायंकाळी 4.30 वाजता श्री देव रवळनाथ कला क्रीडा दशावतार मंडळ (तेंडोली) चे ‘वाली सुग्रीव’ नाटक, 7.30 वाजता पालखी सोहळा, रात्री 8 वाजता श्री देव रवळनाथ मंडळ (तेंडोली) चे ‘श्रीमंत दामोदर पंत’ तीन अंकी सामाजिक नाटक,
दि. 23 रोजी सकाळी 7.30 वाजता देवता पूजन, श्री महादेव लघुरुद्र, श्री जगदंबा भद्रकाली अग्निस्थापन ग्रहयज्ञ, दुपारी 1.30 वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी 4 वाजता शिवप्रेमी मित्रमंडळ (तेंडोली) यांची एकांकीका, 7.30 वाजता पालखी सोहळा, रात्री 8 वाजता श्री देव रवळनाथ “श्री” ची इच्छा मंडळ (तेंडोली) यांचे “ययाती देवयानी” नाटक, दि. 24 रोजी सकाळी 7.30 वाजता देवता पूजन, अभिषेक, 11 वाजता बलीदान, दुपारी 12 वाजता पूर्णाहूती, अभिषेक, 1 वाजता नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, धार्मिक कार्याची सांगता, १.३० वाजता महाप्रसाद, ३.३० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) चे नाटक, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ९ वाजता शिवप्रेमी मित्र मंडळ (तेंडोली) यांची एकांकिका, १०.१५ वाजता रेकॉर्ड डान्स, १०.३० वाजता कलांकुर ग्रुप (तेंडोली -आंबेडकर नगर) यांची “शिक्षण” एकांकिका, दि. 25 रोजी सकाळी 9 वाजता स्वारीचे सातेरी मंदिरात मांडावर आगमन, संचार,आशिर्वादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (तेंडोली) यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.