भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान

भिरवंडे गावामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळीवाऱ्यांचा तडका बसला.अचानक जोरदार वादळ वारे वाहू लागल्याने त्यात आमनीपाचेवाडी येथील पंढरीनाथ सिताराम परब यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे परब यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच अचानक गुरुवारी मध्यरात्री वादळी वारे सुरू झाले. त्यातच विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे  परब यांच्या घराजवळ असलेले आंब्याचे झाड मोडून घराच्या छपरावर पडले त्यामुळे घराच्या छपराचे नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कुणालाही इजा पोचली नाही.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!