डॉक्टरांसाठी 21 एप्रिलला सिंधुरेस्पिकॉन परिषद

डीएफसी सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांचे आयोजन

जिल्हाभरातून 500 डॉक्टर्स राहणार उपस्थित

निलेश जोशी । कुडाळ : डॉक्टर्स फ्रंटर्निटी क्लब सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 21 एप्रिलला आराध्य अडोरर झाराप येथे सिंधुरेस्पिकान या एक दिवशिय वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा इथले नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातले आणि जिल्ह्याबाहेरून सुद्धा 500 हुन अधिक डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित राहतील अशी माहिती डीएफसीचे अध्यक्ष डॉ. संजीव आकेरकर आणि वर्किंग प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते यांनी दिली.
गुरुवारी कुडाळ यथे झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी यावेळी डॉ. जी.टी. राणे, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. संतोष जाधव, डॉ. वैभव आइर, डॉ. गौरी परुळेकर, डॉ. संजय सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ कोलते आणि डॉ. आकरेकर म्हणाले, माणसाची बदलली जीवनशैली शहरीकरण, ग्रामीण भागात श्वसनविकारांचे प्रमाणा वाढते आहे. दमा (अस्थमा), सीओपीडी, इंटरस्टिशियल लंग डिसीज, लाँग कॅन्सर, अलजी या फुफ्फुसविकारांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. लहान मुलांमध्येही ऍलर्जी दम्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेले आढळून येते आहे.वाढत्या आयुर्मानामुळे वयोवृद्ध व्यक्तींमध्ये डायबेटीस, हृदयविकार, संधिवात या आजारांसोबतच उतारवयातील दमा (सीओपीडी) प्रामुख्याने बघायला मिळतो. कोविड महामारीनंतर फुफ्फुसांच्या विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ झालेली दिसुन येत आहे.
या पार्श्वभूमीवर भ्सश्वनविकारांविषयी माहिती निदान व उपचारांच्या आधुनिक पद्धती याबद्दल जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे याकरिता डीएफसी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद कार्यशाळा सिंधुरेस्पिकॉन (Sindhu RespiCon) रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. . याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर झाराप झिरो पॉइंट याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही वैद्यक परिषद होणार आहे. .
यामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आयुर्वेद होमिओपॅथिक व्याख्यानांसोबतच अस्थमा, सीओपीडी लहान मुलांमधील दमा, हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीस, क्रॉनिक कफ, एअर पोलूशन, फुफ्फुसाचे संसर्ग याविषयांवर डॉक्टरांकरिता मार्गदर्शन होणार आहे. सोबतच इनहेलर्स व व्हेंटिलेटर्स या विषयांवर कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुफ्फुसविकार विशेषज्ञ डॉ. सुदिप साळवी (पुणे), डॉ.प्रल्हाद प्रभूदेसाई (मुंबई), डॉ. नितीन अभ्यंकर (पुणे), डॉ. अनिल मडके (सांगली), डॉ. मोहन पोतदार (इचलकरंजी कोल्हापूर), डॉ. प्रवीण भट (गोवा), डॉ. अजित कुलकर्णी (कोल्हापूर), डॉ. नीलेश कोरडे (गोवा), डॉ. जगदील ढेकणे (पुणे), डॉ. हिमांशू पोफळे (पुणे), डॉ. स्नेहल गोवेकर (सिंधुदुर्ग) या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
ही सिंधू रेस्पिकॉन परिषद पशस्वी करण्याकरता डॉ. संजीव आकेरकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ.जी.टी. राणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. गिरीश बोर्डवेकर,, डॉ. वैभव आईर, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गौरी परुळेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय केसरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच डिएफ.सी गव्हंनिग कॉन्सिल व कुडाळ मेडिकल असोसिएशन (केएमए) डॉक्टर्सचे विशेष मार्गदर्शन व सहभाग लाभला आहे.
जिल्ह्यातील व जिल्ल्याबाहेरील जवळपास पाचशे डॉक्टर्सचा या परिषदेमध्ये सहभाग असणार आहे. या व अशाप्रकारच्या वैद्यकीय परिषदांचा जिल्ह्यातील डॉक्टर्सना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. .

error: Content is protected !!