प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये संगीत कार्यशाळेचे आयोजन

मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी पंचक्रोशी संचलित संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये उन्हाळी सुट्टीत संस्थेच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबविले जातात. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत या विषया बद्दल आवड निर्माण व्हावी,संगीत विषयामध्ये असणाऱ्या करियरच्या संधी विषयी माहिती व्हावी,स्वतःच व्यक्तिमत्त्व विकसित करण्यामध्ये संगीत या विषयाचे असणारे महत्व समजावे या उद्देशाने प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये मोफत संगीत कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 सकाळी 8 .30 ते 10.30 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित नाद संगीत अकॅडमी कुडाळचे श्री आदित्य आचरेकर यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत -जास्त विद्यार्थ्यांनी व संगीतप्रेमी नी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालायाचे संगीत शिक्षक श्री अनिल गोवेकर व मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत यांनी केले आहे.