साकेडीत आज डबलबारी भाजनाचा जंगी सामना

बुवा सुजित परब विरुद्ध बुवा विनोद चव्हाण यांची डबलबारी
तांबळवाडी येथील माडा आंबा देवस्थानाजवळ हरिनाम सप्ताह
कणकवली तालुक्यातील साकेडी तांबळवाडी येथे माडा आंबा देवस्थान जवळ सत्यनारायणाच्या महापूजे च्या व हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर शुक्रवारी आज सकाळी 10 वाजता घटस्थापना, दुपारी 11 वाजल्यापासून गावातील भजने, सायंकाळी 7 वाजता विश्वकर्मा दिंडी भजन मंडळ हरकुळ बुद्रुक यांचे भजन, रात्री 9 वाजता हरकुळ बुद्रुक येथील कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ चे बुवा सुजित परब विरुद्ध कुडाळ तालुक्यातील भरणी मधील लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळचे बुवा विनोद चव्हाण यांच्या डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. शनिवारी सकाळी घट विसर्जन व दुपारी 1 वाजता महाप्रसाद होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन ताबळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी