श्री लक्ष्मीनारायण तलावाच्या सौंदर्यात भर घालतोय शेषशाही विष्णू लक्ष्मी देखावा

रामनवमी महोत्सवाचे औचित्य

वासुदेव लक्ष्मण गवंडे यांची कल्पकता

निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील वालावल लक्ष्मीनारायण मंदिर येथे गुढी पाडव्यापासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झालेली आहे या रामनवमी महोत्सवात भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे तलावात असेलेली शेषशाही विष्णू लक्ष्मी मूर्ती.
पुणे येथे स्थायिक असलेले वालावलचे सुपुत्र लक्ष्मण वासुदेव गवंडे यांच्या कल्पकतेतून या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. त्यांचा पुणे येथे आर्ट स्टुडिओ गेल्या 72 साल पासून कलेच्या सेवेत रुजू झाला आहे. विविध गणपती मूर्ती देवतांच्या मूर्ती फोटो प्रमाणे मूर्ती बनवणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या स्टुडिओमध्ये वीस फुटापर्यंत सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींची निर्मिती केली जाते. या कलेचा गौरव करण्याच्या हेतूने विविध मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र कला अकादमी कडूनही गेल्या वर्षी त्यांचा सन्मान झालेला आहे.
वालावलाच्या तलावात तयार केलेल्या शेषशाही विष्णू लक्ष्मीची मूर्ती पाच फुटाची असून फायबर मध्ये बनविलेली आहे.चारही बाजूने उडवलेले कारंजे वालवलच्या तलावाच्या सौंदर्यात भर घालत आहे. यामुळे या वर्षीच्या रामनवमी महोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. लक्ष्मण यांचे बंधु प्रभाकर गावंडे आणि लक्ष्मण गवंडे यांनी या मूर्तीची रचना केलेली आहे. लक्ष्मण गवंडे आज वयाच्या 76 व्या वर्षी सुद्धा कलेची जोपासना करीत आहेत हे विशेष.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!