मिलिंद पाटील याना केमिस्ट असोसिएशनच्या वतीने निरोप

श्री. पाटील यांची पदोन्नतीने नाशिक येथे बदली

सिधूदूर्गचे नूतन अधिकारी अरुण गोडसे यांचे स्वागत

प्रतिनिधी । कुडाळ : अन्न व औषध प्रशासन सिधूदूर्गचे मिलिंद पाटील यांची सह आयुक्त (औषधे) नाशिक या पदावर पदोन्नती झाल्याने सिंधुदूर्ग जिल्हा  केमिस्ट मित्रपरिवार आणि अन्न व औषध प्रशासन सिंधुदूर्ग यांच्या वतीने निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी सायकाळी कुडाळ येथील कोकोनट मध्ये पार पडला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच वर्षे मालवणी भाषेचा गोडवा ऐकायला मिळाला मात्र मालवणी भाषा शिकता आली नाही असे प्रतिपादन श्री पाटील यांनी केले
   मिलिंद पाटील यांच्याकडे गेली अडीच वर्षे अन्न व औषध प्रशासन सिधूदूर्गचा कारभार होता. त्यांची  सह आयुक्त (औषधे) नाशिक या पदावर पदोन्नती झाल्याने सिंधुदूर्ग केमिस्ट व मित्रपरिवार आणि अन्न व औषध प्रशासन सिंधुदूर्ग यांच्या वतीने त्याना निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी सायकाळी कुडाळ येथील कोकोनट मध्ये पार पडला. यावेळी अन्न व औषध प्रशासन सिधूदूर्गचे नूतन अधिकारी अरुण गोडसे, सौ पाटील, केमिस्टचे पदाधिकारी अभय नाईक, काशिनाथ तारी, विनायक वर्दे, शेखर सूपल, आप्पा सावंत, दीपक परब, मंगेश केळूस्कर, संतोष पाताडे, दत्तात्रय पारधीये, प्रसाद तेरसे, संजय कोरगावकर, हरिचंद्र लंगवे, सिद्धेश आचरेकर, सचिन कांबळी,  प्राची तेरसे, सौ  सुप्रिया कांबळी, सौ संयोगिता काळकुद्रेकर, फारुख दोस्ती, मोमीन दोस्ती, संदीप गावडे, मुन्ना परब, श्री भाट, निलेश सावंत, संजय म्हाडगुत, सौ म्हाडगुत, गजानन धुरी, संदीप पडते, शैलेश राजोबा, चंद्रकांत नाईक भाई ठाकूर, अय्याज दोस्ती, मंदार भिसे, संदेश पावसकर, दीपक चव्हाण, शिवराम पणदुरकर, प्रसाद ढेरे जिल्हातील केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   श्री पाटील म्हणाले, मी गेली अडीच वर्षे सिंधुदूर्ग जिल्ह्यात कार्यरत होतो या जिल्ह्याने मला भरभरून प्रेम दिले. माझी नाशिक येथे पदोन्नती झाल्याने जिल्हा सोडावा लागतो नाहीतर अजूनही या जिल्ह्यात राहिलो असतो. या जिल्ह्यातील मालवणी भाषेचा गोडवा मला अनुभवता आला मात्र ही भाषा शिकता आली नाही. अन्न व औषध प्रशासन सेवेत काम करताना नियमांचे पालन करा. आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना लायसन्स कायदे यांच्या अधीन राहा. आपली प्रगती साधा, असे सांगत आज तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेल्याचे सांगितले. नूतन अधिकारी अरुण गोडसे यांनी आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अन्न व औषधमध्ये दोन नंबरच्या रँकिंगमध्ये ठेवण्यात श्री पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री पाटील तुमची बदली झाली तरी जिल्हा तुमचाच आहे. तुमचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लागणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा केमिस्टच्या वतीने श्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या व श्री गोडसे यांचे स्वागत करण्यात आले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!