पत्रकार आणि प्रतिनिधींसासाठी एमकेसीएलची टेक टॉक कार्यशाळा

एमकेसीएलकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत करियर कल चाचणीची सोय

डिजिटल दुनियेत प्रवेश घेण्याचे एमकेसीएलचे आवाहन

निलेश जोशी । कुडाळ : एमकेसीएलच्या वतीने आज कुडाळ येथे पत्रकार आणि एमकेसीएल केंद्र संचालकांसाठी AI तंत्रज्ञान विषयी विशेष टेक टॉक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. MKCL चे रिजनल मॅनेजर तुषार निकम आणि एमकेसीएलचे जिल्हा समनव्यक प्रणय तेली यांनी या विषयी मार्गदर्शन केलं. दरम्यान आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएलच्या सेंटरवर मोफत करियर कल चाचणीची देखील व्यवस्था करण्यात आल्याच प्रणय तेली यांनी सांगितलं. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी एमकेसीएलच्या डिजिटल दुनियेत प्रवेश घ्यावा अस्से आवाहन देखील प्रणय तेली यांनी यावेळी केले.
आज प्रत्येक क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पत्रकारितेत सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवता येतो. कामाचा वेग आणि अचूकता देखील वाढते. याबाबतची माहिती देण्यासाठी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी आज कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास मध्ये पत्रकार आणि एमकेसीएलचे जिल्ह्यातील प्रतिनिधी यांच्यासाठी टेक टॉक कार्यशाळेचे आयोजन केले होते.एमकेसीएलचे रिजनल मॅनेजर तुषार निकम आणि प्रणय तेली यांनी याबाबत अगदी सोप्या शब्दात AI तंत्रज्ञानबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना AI तंत्रज्ञानाची नेमकी कोणती टूल्स वापरायची, कोणत्या सॉफ्टवेअर्सचा वापर करायचा याबद्दल माहिती दिली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या शंकांचे देखील निरसन केले. विशेषतः चाट जीपीटी, cutout.pro, adobe firefly, sketch.Metademolab, Ask QX, MIC Monster, In Video AI अशा ऍप विषयी त्यांनी दिली माहिती विशेष उपयुक्त होती.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन नाईक, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या जोशी, उपाध्यक्ष निलेश तेंडोलकर, प्रमोद ठाकूर, रवी गावडे, अजय सावंत, प्रमोद म्हाडगूत, श्री. कोरणे सर, विलास कुडाळकर,रजनीकांत कदम, प्रसाद राणे, संजय तेंडोलकर, आदी पत्रकार आणि एमकेसीएलचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी मोफत करियर कल चाचणीची संधी

दहावी आणि बारावीच्या विद्‌यार्थ्यांसाठी त्यांचे कल ओळखण्यास मदत करणारी ऑनलाईन टेस्ट अर्थत क्लिक इन्क्लिनेशन टेस्ट म्हणजेच करियर कल चाचणी महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या MSCIT च्या सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व अधिकृत केंद्रामध्ये मंगळवार दिनांक १६ एप्रिल ते शुक्रवार दि. २६ एप्रिल या कालावधीत वि‌द्यार्थी मोफत देऊ शकतील. मनोविकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केलेली कलचाचणी असून त्यामधून वि‌द्यार्थ्याला लगेच त्यांच्या संदर्भात रिपोर्ट मिळतो. अंगभूत क्षमता आणि कल ओळखण्यास मदत करणारी ही टेस्ट आहे. उच्च शिक्षण शाखा आणि करिअर्स निवड करण्यासाठी ऑनलाईन रिपोर्ट या चाचणीतून मिळतो. आपले योग्य करिअर निवडण्याकरिता विद्यार्थ्यांनी या कल चाचणीचा फायदा घ्यावा असे आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी यावेळी केले. तसेच या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या डिजिटल दुनियेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन देखील प्रणय तेली यांनी केले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!