ग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन
रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोवा येथून दहा संघांचा सहभाग
निलेश जोशी । कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कै. कु साहिल कुडाळकर स्मरणार्थ गृप डान्स स्पर्धेत एन.के. कलमांच चिपळूण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याना रोख रुपये १५ हजार ५५५ आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
कुडाळच्या श्री देव कुडाळेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने रविवारी रात्री उशिरा कै. कु साहिल कुडाळकर स्मरणार्थ गृप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा याठिकणहून या स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कुडाळेश्वर मित्र मंडळच्या युवा कार्यकर्त्यानी आकर्षक असा देखावा रंगमंचावर उभारला होता. या भव्य देखाव्याचे उदघाटन उत्सव मंडळाच्या कार्यात सातत्याने ३०-३५ वर्षे कार्यरत असलेल्या पिढीतील सदस्य रुपेश कुडाळकर, सत्यवान राऊळ, सुशील परब ,राकेश राऊळ, महेश कुडाळकर, निलेश कुडाळकर, महेश राऊळ,गजानन घाटकर नंदू कुंटे व इतर मंडळी तसेच भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक सुशील सुमन राऊळ व योगेश कृष्णा कुडाळकर यांनी श्रीफळ वाढवून केले.
या स्पर्धेत एन.के. कलमांच चिपळूण यांनी सादर केलेल्या डांगी नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला. . त्याना रोख रुपये १५ हजार ५५५ आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सिध्दाई डान्स ॲकडमी कुडाळ यांनी सादर केलेल्या ओरिजनल कोळी नृत्यला मिळला. त्यांना रोख रुपये ११ हजार १११ व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तिसरा क्रमांक आरडीएक्स क्रू सावंतवाडी यांनी सादर केलेल्या वेस्टर्न नृत्याला मिळला. त्यांना रोख रुपये ५ हजार ५५५ आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ प्रथम व्ही गृप कुडाळ यांनी सादर केलेल्या कराकट्टम नृत्याला आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक बाळूमामाच्या नावानं चांगभलं – रांगणा तुळसूली संघाला मिळाला. त्या दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रुपये २ हजार ५५५ आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट नर्तक म्हणून अविराज अंकुश जाधव आणि तन्वी रुपेश जळवी यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रत्येकी रोख रुपये १ हजार ५५५ आणि चषक देण्यात आला.

या स्पर्धेत परी डान्स क्रिएशन कुडाळ, द स्टेपर चिपळूण, कला नक्षत्र कुडाळ, ज्ञानदीप युवा कला मंच, एस के डान्स, कणकवली असे इतर संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण लोकनृत्य क्षेत्रातील मुबंई येथील नामांकित परीक्षक हितेश सांदणे आणि अनुराधा लाड यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन सुप्रसिद्ध निवेदक नागेश नेमळेकर यांनी केले.
दरवर्षी श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ यांच्या तर्फे शहरात कला-क्रीडा क्षेत्रात कुडाळ चे नाव मोठं करणाऱ्या कलाकारांचा सत्कार केला जातो. त्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आकाशवाणीचे वृत्त प्रतिनिधी पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी, बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ, महानाट्य अयोध्या, कुडाळ, क्रिकेट खेळाडू यतीन उर्फ गोटया नारायण कांबळी व राहूल गणेश काळप यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच युवा कलाकार संकल्प चंदन दळवी व मयूरेश राजन राऊळ याचा विशेष सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.