तेंडोलीत १४ आणि १५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य
प्रतिनिधी । कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय भीम युवक मित्र मंडळ तेंडोली आंबेडकर नगर यांच्यावतीने 14 व 15 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्ससह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ही स्पर्धा तेडोली आंबेडकर नगर येथे 14 एप्रिल ला रात्री आठ वाजता जिल्हास्तरीय मोठा गट व लहान गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी मोठा गट अनुक्रमे रुपये ५ हजार, रु ३ हजार, रु २ हजार, उत्तेजनार्थ प्रथम रुपये ५००/- दुसरे रुपये ५००/- आणि आकर्षक चषक अशी पारितोषिके आहेत. तसेच लहान गटासाठी रुपये ३ हजार रु २ हजार रु १ हजार उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये ५००/- ची चार पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.
स्पर्धकांनी आपली नावे प्रशांत तेंडोलकर 93 7047 10 18, सिद्धेश तेंडोलकर 90 21 51 63 97, तेजस तेंडोलकर 91 58 48 9504 यांच्याकडे द्यावीत. स्पर्धेच्या अगोदर अभिवादन सभा होणार आहे. ता 15 ला महिला मुलांसाठी विविध गुणदर्शन पर कार्यक्रम होणार आहेत स्पर्धकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जय भीम युवक मित्र मंडळ तेंडोली आंबेडकर नगर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.