निवडणूक काळात सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडा – जिल्हाधिकारी

कुडाळमध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी । कुडाळ : निवडणूक कामकाजामध्ये काम करीत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग किशोर तावडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व क्षेत्रीय पोलिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच २६९-कुडाळ विधानसभा मतदारसंघ मधील सर्व अधिकाऱ्यांची आज दुपारी मराठा समाज हॉल कुडाळ येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये जिल्ह्याधिकाऱ्यानी सर्व क्षेत्रीय पोलीस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना त्यांचे मतदान प्रक्रियेबाबत विस्तारित व सविस्तर विश्लेषण करून मार्गदर्शन केले.
या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपविभागीय अधिकारी कुडाळ तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार 269- विधानसभा मतदार संघ श्रीमती. ऐश्वर्या काळूशे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कृषिकेश रावले कुडाळ आणि मालवणचे तहसीलदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग किशोर तावडे म्हणाले, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांमधील दुवा म्हणून कामकाज आणि भूमिका पार पाडायची आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना वाहन व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे त्याच वाहन व्यवस्थेतून निवडणूक विषयक कामकाज पार पाडल्या बाबत सूचना देण्यात आल्या. निवडणूक कामकाजामध्ये काम करीत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडायची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्र यांना समक्ष भेटी देऊन सर्व सुविधा सुस्थितीत असल्याबाबतची पुन्हा एकदा खात्री करणेबाबत सूचना दिल्या.
निवडणूक प्रक्रियेमधील गृह भेट द्वारे टपाली मतदान प्रक्रिया , निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील प्राप्त वेळापत्रकानुसार गृहभेटी द्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रातील गृह भेटीद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रिये बाबत गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सतर्क राहून कामकाज करणे बाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सूचना दिल्या.
दुसरे प्रशिक्षण वेळी पी आर ओ आणि पी ओ यांच्या निवडणूक कर्तव्याच्या अंतिम आदेश वितरित केले जाणार आहेत. तरी क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रातील Pro,PO यांच्याशी संपर्कात राहून केंद्राचे केंद्राचे साहित्य ताब्यात घेतले की नाही याची खात्री करून मगच केंद्रावर ती कर्मचारी रवाना करण्याचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांनी सकाळी लवकर आपापल्या मतदान केंद्रावर भेट द्यावी व मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे. अशा सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी सर्व क्षेत्रीय पोलिस अधिकारी यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कृषिकेश रावले यांनी देखील मार्गदर्शन केले.
शाडो मतदान बाबत सुद्धा मार्गदर्शन
शाडो मतदान केंद्र जिल्ह्यामध्ये अशा केंद्रांची संख्या 92 इतकी आहे. अशा केंद्रावरती संपर्क साधण्याकरिता संपर्क बाबतचे नियोजन, वाहतूक नियोजन, कर्मचारी यांचे आरोग्यविषयक तक्रारींचे पूर्व नियोजन करावे , ॲम्बुलन्स व्यवस्था करावी इत्यादी पूर्वनियोजन शाडू मतदान केंद्राचे करणे आवश्यक असल्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. सदर शॅडो मतदार केंद्र करिता नोडल अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक कुडाळ , श्रीम मुल्ला मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इन्क्वायरी ॲप मधून राजकीय पक्ष यांच्या सभा, रॅली इत्यादी ना हरकत प्रमाणपत्र ,ना हरकत दाखला तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित पोलीस अधिकारी व उपविभाग कार्यालय कुडाळ येथील संबंधित अधिकारी यांना सूचना करण्यात आली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.