पाट हायस्कूलमधील कला विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवप्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धा
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मधील शिवप्रसंगावर आधारित चित्रकला सार्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
यामध्ये दुस क्रमांक कुमार प्रतीक मेथर, तृतीय क्रमांक कुमारी धनदा सावंत तर उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी धनश्री पाटकर व कुमार मनीष चव्हाण यांनी मिळविला. विजेत्यांचे अनुक्रमे १५०० रु १२००रु १००० रु उतेजनार्थ ५०० रुपये – सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून संस्था आणि विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले
यावेळीमुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, कलाशिक्षक , संदीप साळस्कर, ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर, ज्येष्ठ शिक्षक सयाजी बोंदर व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच कलाविषयात विविध स्पर्धेतील विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. यामधे गोडकर आर्टस मालवण यांच्यातर्फे एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यामधील यशस्वी विद्यार्थ्याचे चित्र प्रदर्शन मालवण येथे मांडण्यात येणार आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.