आयडियल इंग्लिश स्कूलच्या यश पवारचे बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी यश.

कणकवली/मयूर ठाकूर
नुकत्याच लांजा येथे संपन्न झालेल्या “गणपती चेस अकॅडमी” स्कॉर्पिअन सोलार प्रायोजित खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या यश देऊ पवार इयत्ता नववी या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे. या स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्धी अनेक खेळाडूंवर आपल्या कुशल अशा प्रकारच्या बुद्धिबळातील कौशल्याने यशने चमक दाखवत हे पारितोषिक प्राप्त केले आहे त्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यासोबतच डेरवण तालुका चिपळूण येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यशने यश मिळवले यशचे हे दुहेरी यश निश्चितच आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे.
या यशाबद्दल त्याचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर सर खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी. पी. तानावडे सर मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गामधून अभिनंदन केले जात आहे





