घोटगे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात अजून एक नामांकित तुरा

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील घोटगे बाजार येथील दुकानदार आणि नागरिकांची कित्येक वर्षांची असलेली कचरा गाडीची मागणी सरपंच चैताली ढवळ यांनी पूर्ण केली. घोटगे गाव हा जांभवडे पंचक्रोशीचा केंद्रबिंदू आणि बाजारपेठ असल्याकारणाने परदेशातील तसेच पंचक्रोशीतील लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने बाजारपेठेत कचरा ही समस्या लक्षात घेता सरपंच यांनी ग्रामपंचायत घोटगे येथे तात्पुरत्या स्वरूपाचा स्वच्छ्ता कर्मचारी लवेश तांबे यांची नेमणूक केली. रोज सकाळी ८ वा. कचरा उचलण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत जवळ असलेली सायकल स्वच्छ्ता संदेश देत घरोघरी जाऊन कचरा घेऊन च्या नदीकडे शोषखड्ड्यामार्फत योग्य विल्हेवाट लावली जाते. हा कचरा उचलण्यासाठी दुकान व घर यासाठी ८० रू. प्रमाणे व फक्त घरासाठी ५० रू. प्रमाणे आकारणी करण्यात आली ,ही आकारणी सर्वांच्या सहमताने ठरवण्यात आली ही स्वच्छ्ता पट्टी व आठवडा बाजार पट्टी जी बंद होती ती ३० रू. प्रमाणे जमा करून स्वच्छ्ता कर्मचारी यांचे मासिक मानधन दिले जाते.
अशा या स्वच्छ्ता उपक्रमासाठी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे पंचक्रोशी व गावात भरभरून कौतुक केले आहे

error: Content is protected !!