म्हापसा (गोवा) येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल
संविता आश्रमःपणदूर – – गोव्यातील म्हापसा येथून एका निराधार व्यक्तीला नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
गेले कित्येक दिवस ,महिने हा बांधव त्याच्या पायाच्या जबर दुखापतीसह म्हापसातील रस्त्यावर व्यसनाधीन स्थीतीत निराधार, वंचित व नैराश्यग्रस्त जीवन जगत होता. जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक राघवेंद्र सर यांच्या निदर्शनास हा बांधव आल्यावर त्यांनी याविषयी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांना माहिती दिली. संदिप यांनी याविषयी तात्काळ दखल घेवून सहकारींना बांधवास आश्रमात दाखल करण्यासाठी सूचना केली.
मूळ सावंतवाडीतील सावंत (वय ४७) नावाची ही मध्यमवयीन व्यक्ती मोठ्या हाँटेलमधे नोकरीत होती. मात्र मधल्या काळात एका अपघातात त्यांच्या पायाला झालेल्या जबर दुखापतीमुळे आणि वैयक्तिक जीवनातील तणावांमुळे निराशा ग्रस्त झाला होता.
म्हापसा पोलीस स्टेशनद्वारा बांधवास नुकतेच संविता आश्रमात दाखल करण्यात आले. आश्रमात त्याच्या अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा पुर्ण होत असून योग्य ते औषधोपचार आणि मानसोपचार होत आहेत.
बांधवाला म्हापसा येथून संविता आश्रमात दाखल करण्यामधे जीवन आनंद संस्थेचे गोवा मधील समन्वयक प्रसाद आंगणे, संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत, संस्थेचे कर्मचारी यांचेसह संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांची भूमिका राहिली.
संदिप परब
संविता आश्रम,पणदूर ता.कुडाळ
जीवन आनंद संस्था
किसन चौरे, कोकण नाऊ