कणकवली नगरपंचायत मध्ये सहाय्यक नगर रचनाकारांची नियुक्ती मात्र, त्यांची वारंवारची गैरहजेरी चर्चेत!

नियुक्ती होऊन देखील अनुपस्थितीमुळे जनतेची कामे रखडली

जिल्हाधिकारी किशोर तावडे लक्ष देतील काय?

कणकवली वासीयांमधून उपस्थित केला जातोय सवाल

गेली काही महिने कणकवली नगरपंचायत च्या रिक्त असलेल्या सहाय्यक नगररचनाकार या पदावर अखेर सोनल अजळकर यांची नियुक्ती करण्यात आली. 1 फेब्रुवारीपासून त्यांनी आठवड्याचे दोन वार यामध्ये गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस नगरपंचायत कार्यालयामध्ये सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र सहाय्यक नगररचनाकार या पदावर नियुक्ती दिल्यापासून अजळकर यांच्या अनुपस्थितीची कणकवली शहरामध्ये चर्चा आहे. नगरपंचायत अंतर्गत दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानगी किंवा त्या अनुषंगाने कामे मार्गी लागण्यासाठी सहाय्यक नगर रचनाकार यांची भूमिका ही महत्त्वाची असते. कणकवली मुख्याधिकारी हे याबाबतचे आदेश देण्यापूर्वी सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र ही प्रक्रिया पार करण्यासाठी सहाय्यक नगररचनाकार या दिलेल्या दोन दिवशी नियमित हजर राहण्याची गरज होती. मात्र तसे प्रत्यक्षात होताना दिसून येत नाही. गेले काही दिवस त्यांची सातत्याने असणारी गैरहजेरी ही शहरातील जनतेला त्रासदायक ठरत आहे. कणकवली नगरपंचायत चे प्रोबेशनरी असलेले मुख्याधिकारी यांच्यासह नगर रचना विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी हे या प्रकरणी लक्ष देतील का? असा देखील सवाल कणकवलीकर जनतेतून उपस्थित केला जात आहे. अनेकदा सहाय्यक नगररचनाकारांच्या दिलेल्या वारांच्या दिवशी त्यांची गैरहजेरी हा कणकवली शहरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण बांधकाम व्यवसायिक, सर्वसामान्य जनता या दिलेल्या वारा दिवशी नगरपंचायत मध्ये गेल्यास अजळकर अनुपस्थिती विषयी चर्चा जास्त होत असल्याने याबाबत ठोस निर्णयाची गरज आहे. नियुक्ती नंतर कार्यालयात दिलेल्या दिवशी उपस्थित राहून जनतेची नियमानुसार कामे मार्गी लावणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्या जागी नवीन नियुक्ती देण्याची गरज आहे व तशी मागणी कणकवली वासियांमधून केली जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशोर तावडे लक्ष देतील का? असा सवाल कणकवलीतील जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!