उत्तम दर्जाचा कृत्रिम पाय मोफत रोपण कार्यक्रम

दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा – रुपाली पाटील यांचे आवाहन

मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई व साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, गोव्यामध्ये उत्तम दर्जाचा, कृत्रिम पाय मोफत रोपण करून दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम पायाची आवश्यक्यता आहे.असा कृत्रिम पाय जो दुमडू शकतो, सर्व कामे जसे कीं उभारणे,चालणे,धावणे,सर्व क्रिया उत्तम रित्या करता येण्यासाठी,चांगल्या कपंनीचा,(अंदाजे ₹80,000) उत्तम दर्जाचा, गोव्याला घेऊन जाऊन पाय मोफत रोपण करून दिला जाणार आहे. दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर,आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही हे कार्य हाती घेतले आहे.
तरी कृत्रिम पायाची आवश्यकता असणाऱ्यां बांधवांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व पाया सहित सम्पूर्ण फोटो,नाव,पत्ता व फोन नंबर लवकरात लवकर (9049271744) यां संपर्क क्रमांक wp वरती पाठवावी. या उत्तम दर्जाच्या साधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीम. रुपाली पाटील.
संस्थापक,अध्यक्षा
साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग,
दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी,वेंगुर्ला. यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)

error: Content is protected !!