राज्यस्तरीय हँकाथाँन स्पर्धेत प्रगत विद्यालय रामगडचे दिमाखदार यश

रामगड (तालुक्यात मालवण) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,महाराष्ट्र राज्य,शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य तसेच ‘amazon’ कंपणी यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,शासन अनुदानित शाळांमध्ये काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदयार्थ्यानी 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करावी व त्याबरोबर मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग,सांघिक कार्य(टीमवर्क),तार्किक विचार आणि कोडिंग याचे ज्ञान अवगत होईल यासाठी काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव हा इयत्ता 4थी ते 8वी मधील विदयार्थ्यासाठी घेण्यात आला .
या उत्सवात ‘अनप्लग’ इवेंटसाठी राज्यातील 23331 विदयार्थ्यानी नोंदनी केली त्यापैकी 10000 विदयार्थ्यानी यातील चेलेंज सोडवले व त्या विदयार्थ्याची जिल्हास्तरावर प्लग इवेंटसाठी निवड झाली त्यातून फक्त 42 विदयार्थी राज्यभरातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले . राज्यस्तरीय स्पर्धा दि 21/02/2023 ते दि.23/02/2024 या कालावधीत amazon सेंटर,पुणे येथे पार पडली या स्पर्धेत प्रगत विदयामंदिर,रामगड,ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग या प्रशालेने कोडींगवर आधारीत डिवायसीस ( प्रतिकृती)तयार करून राज्यस्तरावर सादर केली.उत्तम सादरीकरण,उत्तम प्रात्यक्षिक,उत्तम कोडींग केल्याने वरील विदयार्थीनी महाराष्ट्र राज्यात दहावी रँक प्राप्त केली.त्या बध्दल खालील विदयार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

1) कु.ओमतेज उल्हास तारी
2)” प्रणय शैलेश जाधव
3)” जानू शंकर घाडीगांवकर

वरील विदयार्थ्याना प्रत्येकी 24000रू.चे तीन टँब व शाळेसाठी 48444रू.चा लँपटाँप व रोख रक्कम 1500/-असे एकूण 121944रू.चे बक्षीस देण्यात आले .
वरील सर्व विदयार्थ्याचा amazon कंपणीचे पुणे शाखेचे हेड मा.श्री.अनिकेत नातू तसेच CS हँकाथाँनचे हेड मा.श्री.इरफान ललानी , पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सौ.गायकवाड मँडम,डायट धिव्याख्याता मा.श्री.काळे याच्याहस्ते सत्कार करण्यात आला

यशस्वी सर्व विदयार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचेप्रशालेच्यावतिने तसेच ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे

error: Content is protected !!