बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी
निलेश जोशी । कुडाळ : लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे, हितचिंतक कुडाळ- वेंगुर्ले मतदार संघाचे माजी आमदार कै.पुष्पसेन सावंत यांच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संस्था चेअरमन उमेश गाळवणकर हे संस्था चालवत आहेत. त्यांना आपल्या गुरुस्थानी मानून कार्य करताना त्यांच्या विचारांची, कार्याची ओळख सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्या प्रती श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांची जयंती व पुण्यतिथी संस्थेमध्ये साजरी करण्यात येते. आज दिनांक २१फेब्रु.रोजी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
सामान्यातील असामान्य धाडसी लोकनेते, सामान्य जनतेचे कैवारी म्हणजे पुष्पसेन सावंत आहेत अशा शब्दात प्रा. अरुण मर्गज यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर प्रा. परेश धावडे यांनी “सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले लोकांचें आमदार “अशा शब्दांत त्याचा गौरव करुन आदरांजली अर्पण केली.
उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रा.योगीता शिरसाट,प्रा.प्रांजना पारकर,प्रा.अर्जुन सातोस्कर, मंदार जोशी,प्रा.प्रणाली मयेकर,प्रा शांभवी आजगावकर -मार्गी,चेतन मोरजकर व बी.एड च्या छात्राध्यापिका व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.