घोटगे येथील देवी बोरचाई मंदिरचा उद्या वर्धापन दिन सोहळा

प्रतिनिधी, कुडाळ

घोटगे येथील श्री देवी बोरचाई मंदिरचा वर्धापन दिन सोहळा उद्या, १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
१५ रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, “देवीवर देवीसुक्तांचा महाभिषेक” महापूजा, देवता स्थापन, अग्निस्थापना, गृहस्थापना, सग्रहमख, सप्तशती, पाठ हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, प्रार्थना, आरती, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री ८.३० वाजता बुवा हर्षद ढवळ यांचे भजन, ९.३० वाजता लिंगेश्वर भजन मंडळ (भरणी बुवा- विनोद चव्हाण) व चैतन्य गगनगिरी भजन मंडळ (उंबर्डे बुवा-श्रीकांत शिरसाट) यांच्यात डबलबारी सामना होणार आहे. या वर्धापनदिन सोहळ्यास भाजप नेते निलेश राणे, जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, घोटगे सरपंच चैताली ढवळ, उपसरपंच सचिन तेली व ग्रा. पं. सदस्य यांची उपस्थिती आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!