भिरवंडे रामेश्वर मंदिरात शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताह
विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शुक्रवार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी माघ शु. रथसप्तमीच्या शुभमुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 8 दिवस संपूर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.
कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या भिरवंडे गावाला ऐतिहसिक, राजकीय, सामाजिक परंपरा लाभली आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर हे सिंधुदुर्गातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. हरिनाम सप्ताहासाठी संपूर्ण भिरवंडे गाव सज्ज झाला आहे. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी मंडळीही मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वा. ढोलताशांच्या गजरात घटस्थापना करून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 8 दिवस हरिनामाच्या गजरात अवघा भिरवंडे गाव दंग होणार आहे.
सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांची भजने, दिंड्या तसेच ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक विषयांवरील चित्ररथ सादर होणार आहेत. त्याचबरोबर दुसर्या रात्रीपासून श्री देव रामेश्वराची पालखी प्रदक्षिणा हे या सप्ताहाचे खास वैशिष्ट्य आहे. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत हरिनामाचा गजर करत निघणार्या या पालखी प्रदक्षिणेत सर्वजण भक्तीभावाने सहभागी होतात. सप्ताह कालावधीत 8 दिवस जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक भक्तगण या उत्सवासाठी येवून श्री देव रामेश्वराचे दर्शन आणि दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतात. तरी शुक्रवारपासून साजरा होणार्या हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालये संचालक मंडळ व भिरवंडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे – शनिवार 17 फेब्रुवारी दु. 1 वा. बुवा ः शशिकांत राणे ( भालचंद्र बाबा प्रा.भजन मंडळ, कणकवली) रात्री 9 वा. बुवा-प्रथमेश मोरये (पिंपळेश्वर प्रा.भजन मंडळ, नागवे), रात्री 9.30 वा. वारकरी भजन बुवा-चंद्रकांत काणकेकर (श्री काळंबादेवी प्रा. भजन मंडळ, वारगाव), रात्री 10.30 वा. चित्ररथ (बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम, कणकवली), रविवार 18 फेब्रुवारी ः दु. 1 .30 वा. महिला भज़न
(महापुरुष महीला भज़न, नांदगाव), रात्री 8.30 वा. बुवा – गजानन तेली (भुतनाथ प्रा.भजन मंडळ, शिवडाव), रात्री 9.30 गोपनृत्य – चुनवरे, मालवण, रात्री 10 . 30 वा. बुवा – योगेश पाचांळ
(विश्वकर्मा भजन मंडळ, भरणी), सोमवार 19 फेब्रुवारी दु. 12 वा. पखवाज अलंकार – महेश सावंत, कुडाळ (श्री जगन्नाथ संगीत विद्यालय प्रस्तूत -भजना रंग, ध्रुपद,चौताल 51 पखवाज, 5 ढोलकी 3 तबला आणि तीन युवा गायकांचा संगीत कलाविष्कार), रात्री 9 वा. संगीत भजन बुवा- चेतन गुरव (काशिकलेश्वर प्रा. भजन मंडळ, कलमठ), रात्री 10.30 वा. बालदिंडी- शिवछत्रपती अश्वारूढ, बालसंभाजी आणि मावळे
शिवजयंत्ती निमित्त खास सोहळा (सादरकर्ते वादळ मेस्त्री-रामेश्वर माऊली वशिक दशावतार मंडळ, नाटळ), मंगळवार 20 फेब्रुवारी दु. 12 वाजता वारकरी भजन ज्ञानेश्वर महाराज (प्रा.भ.मंडळ, खांबाळे)
दु. 1 वा. महिला भजन (भिरवंडे महीला मंडळ, मुंबई)
रात्री 8.30 संगीत भजन – बुवा भगवान लोकरे (श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ,मुंबई-भांडुप), रात्री 10 वा. समईनृत्य (ब्राम्हणदेव महीला मंडळ,नाद, देवगड), रात्री 11 वा. संगीत भजन – बुवा गोपीनाथ बागवे
(गोपीकृष्ण गुरूकुल साप्र. भजन मंडळ, मुंबई), बुधवार 21 फेब्रुवारी दु. 1 वा. दिंडीभजन (श्री पावणादेवी भगवती दिंडी पथक- बांदिवडे, पालयेवाडी), रात्री 9 वा. बुवा -सुजित परब (कोटश्वर प्रा.भजन मंडळ – हरकुळ बुद्रुक), रात्री 11.30 वा. चित्ररथ (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी)
गुरूवार 22 फेब्रुवारी दु. 12 वा. स्वरनिनाद (अभंग भक्तीगीत, भावगीत
समर्थ कलेश्वर ग्रुप – कलमठ), रात्री 9.30 संगीत भजन बुवा – उदय राणे (राधाकृष्ण प्रा. बजन मंडळ, जानवली), रात्री 10 वा. संगीत भजन – बुवा – हेमंत तेली (पावणादेवी प्रा. भजन मंडळ, फोंडाघाट), रात्री 10 वा. चित्ररथ (जि.प. केंद्रशाळा, भिरवंडे नं. 1), शुक्रवार 23 फेब्रुवारी दु. 2 वा. समाप्ती.
कणकवली, प्रतिनिधी