छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत डामरे यांचे प्रतिपादन
असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे कौतुरकास्पद आहेच. त्यामुळे आपण जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुयात असे प्रतिपादन असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले.
असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायची चेअरमन भगवान लोके , सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, शिवसेना उपविभागप्रमुख तात्या निकम, आबू मेस्त्री, माजी सरपंच लक्ष्मण लोके, संजय डगरे, जयराम डामरे, सुरेश मेस्त्री, उदय परब, विजय डामरे, पत्रकार उत्तम सावंत, मिलींद तांबे, दिपक तांबे, दयानंद लोके व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन भगवान लोके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर झाला. लोककल्याणकारी कारभार करत संपुर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेवून रयचेचा राजा कसा असावा? हे आपण अनुभव आहोत. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्वसमावेशक धोरण राबवून राज्य केल्यानेच आजही त्यांचा कार्याचे संपुर्ण जगात स्मरण केले जात आहे. या मंडळाने गेली १३ वर्षे सातत्यपूर्वक ही शिवजयंती साजरी करण्याचा कार्यक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे.
निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे वारसदार आपण सर्वजन आहोत . या मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंती आणि दहीहंडी उत्सव सातत्याने साजरा करत आहेत. शिवजयंतीचा जल्लोष पाहून राजाचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहे.
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन, महिलांसाठी हळदीकुंकु, फनीगेम्स, लहान मुलांची शिवचरित्र या विषयावर भाषणे आणि रात्रौ लहान मुलांचा रेकॉर्ड डान्स कार्यक्रम पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शामराव परब, अध्यक्ष समीर परब, उपाध्यक्ष तुषार घाडी, खजिनदार सत्यवान घाडी, अनंत शिंदे, शामराव परब, महादेव परब, निलेश शिंदे, अनिल परब, मंगेश चव्हाण, आत्माराम घाडी, तातोबा घाडी, विशाल परब, मधुसुदन परब, विश्वनाथ परब, सुरेश परब, ज्ञानेश्वर घाडी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
दिगंबर वालावलकर / कणकवली / कोकण नाऊ