जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे चे यश

कणकवली/मयूर ठाकूर

शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल ओरोस या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे या स्पर्धेत प्रशालेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. रंजना चव्हाण हिने प्रथम क्रमांक तर इयत्ता आठवी ची दुसरी विद्यार्थिनी कु.सृष्टी चव्हाण हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे रिकव्हर टाईप या प्रकारामध्ये या दोघींनी हे यश संपादन केले आहे त्यांच्या या यशासाठी तिरंदाजी प्रशिक्षक श्री कावले सर यांनी विशेष परिश्रम घेतले
या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी आणि प्रशिक्षकांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!