सेवानिवृत्त तहसीलदार रमाकांत पाटील यांचे निधन

सेवानिवृत्त तहसीलदार व कणकवली शहरातील गांगोवाडी येथील रमाकांत शांताराम पाटील ( 88 ) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने बोरिवली मुंबई येथे निधन झाले. त्यांच्यावर बोरिवली येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन मुली ,
भाऊ, भावजय, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.






