मालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला
मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसनूरवर स्वारी केली. हि छत्रपतींची पहिली आरमारी स्वारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते मालडी बंदर. येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला.