गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार!
जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत एकमताने ठराव
तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे शिवसैनिक, व गाव तिथे शाखा हे अभियान राबवत अहिवसेना मजबूत करण्यात येणार आहे. तसेच पक्ष वाढीसाठी या पुढे प्रत्येकाने जोमाने कामाला लागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले.शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृत रित्या निवडणूक आयोगाने दिल्यावर सिंधुदुर्ग शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवलीत घेण्यात आली. या बैठकित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी दिली.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात नव्याने काही पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. तसेच शिवसेना वाढिसाठी सर्वांनी प्रयत्न करत असताना विकासाचे धेय्य ठेऊन काम करा विकास निधी साठी शासन आपल्यासाठी आहे. विकास कामे करत असताना जनता सोबत जोडली पाहिजे असे प्रयत्न करा असे आवाहन श्री आंग्रे यांनी केले. येत्या काळात नगरपंचायत, जि प, प स निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या तयारीला लागा, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. भाजपा व शिवसेना युतीतून काम करत असताना विरोधकांचे नामोनिशाण राहता नये यासाठी कामाला लागा असे आदेश नेत्यांकडून देण्यात आले.
दिगंबर वालावलकर /कणकवली