भर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली

कणकवली पटवर्धन चौका नजीकची घटना

पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू

कणकवली शहरात एका वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावून अज्ञात चोरट्याने पळ काढल्याची भर दिवसा धक्कादायक घटना आज शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवली शहरात बँक ऑफ इंडिया समोरील भागात सर्विस रस्त्यावर हा प्रकार घडला. दरम्यान हा चोरटा बॅग हिसकावून भालचंद्र महाराज आश्रमाच्या दिशेने पळाला. या दरम्यान ज्या वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावली त्या वृद्धाने चोर चोर अशी ओरड मारल्यानंतर तेथील रिक्षा व्यावसायिक व अन्य लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ कणकवली पोलिसांना देण्यात आली. कणकवली पोलिसांनी पथकाच्या माध्यमातून या चोरट्याचा शोध सुरू केला असून, चोरट्याच्या शोधासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान ज्या वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावली ते वृद्ध बँक ऑफ इंडिया मधून बाहेर पडले होते. त्यामुळे त्या बागेत रक्कम असण्याची शक्यता होती ही माहिती मिळाल्याने चोराने ही बॅग हीसकावून नेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!