साकेडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा ठरलेल्या लक्षवेधी

कणकवली तालुक्यातील साकेडी येथे गेल्या वर्षी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी फौजदारवाडी सह गावातील ग्रामस्थांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची देखील वेशभूषा करून गाणी सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी गावातील अनेक लोकांनी छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी संतोष राणे, संजय शिरसाट, राजू सदवडेकर, बंडू मेस्त्री, मुरारी राणे, अरविंद राणे, लक्ष्मण गुरव, राजू सदवडेकर, सत्यवान मुंनगेकर, प्रशांत जाधव, विनोद जाधव, मंगेश जाधव, सुशील जाधव, संजय गुरव, समिधा वारंग यांच्यासह अन्य शिवप्रेमी देखील उपस्थित होते.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!