श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वह्यांचे उदार दान

कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयास समाजाभिमुख उपक्रमांतर्गत मूळचे परुळे येथीलआणि सिद्ध परफेक्ट सिस्टीम प्रा. लि., पुणेचे व्यवस्थापक प्रथमेश नाईक यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १५ डझन वह्यांचे उदार दान दिले. याप्रसंगी चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई तसेच विद्यालयाच्या वतीने प्रथमेश नाईक-परुळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळणार असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!